इनपूट टॅक्‍स म्हणजे काय ? INPUT TAX CREDIT

इनपूट टॅक्‍स म्हणजे काय?

इनपूट टॅक्‍स म्हणजे केंद्रीय कर (CGST), राज्य कर (SGST), एकात्मिक कर (IGST) किंवा केंद्रशासित प्रदेश कर (UTGST), जो नोंदणीकृत व्यक्‍तीला करण्यात आलेल्या वस्तू/माल किंवा सेवांच्या किंवा दो-हींच्या पुरवठ्यांवर आकारला जातो. यामध्ये रिव्हर्स चार्ज आधारित अदा केलेला कर आणि वस्तूंच्या आयातीवर आकारलेले एकात्मिक कर (IGST), वस्तू/माल आणि सेवा कर यांचा समावेश आहे. संयुक्‍त कर आकारणी अंतर्गत अदा केलेला कर यात अंतर्भूत नाही.

रिव्हर्स चार्ज आधारित अदा केलेल्या GSTला इनपूट टॅक्‍स मानता येते का?

होय. इनपूट टॅक्‍सच्या व्याख्येत रिव्हर्स चार्ज अंतर्गत “देय कर” अंतर्भूत आहे.

इनपूट वस्तू/माल (Input goods), इनपूट सेवा, आणि/किंवा भांडवली वस्तू/माल यावर अदा केलेला कर (CGST / IGST / SGST) इनपूट टॅक्‍समध्ये समाविष्ट असतो का?

होय, इनपूट टॅक्‍समध्ये इनपूट वस्तू/माल, इनपूट सेवा, आणि/किंवा भांडवली वस्तू/माल यावर अदा केलेला कर (IGST / CGST / SGST) समाविष्ट असतो. भांडवली मालावरही अदा केलेल्या कराचा लाभ एक रक्‍कमी उपभोगण्याची अनुमती आहे.

वस्तू/माल किंवा सेवांच्या पुरवठ्यावर आकारलेल्या सर्व इनपूट टॅक्‍सचा लाभ घेण्याची GST अंतर्गत अनुमती आहे का?

अन्‍य अटीं आणि निर्बंधांच्या अधीन राहून नोंदणीकृत व्यक्‍ती त्याला करण्यात आलेल्या वस्तू/माल किंवा सेवांच्या पुरवठ्यावर आकारण्यात आलेल्या इनपूट टॅक्‍सचा लाभ घेण्यास पात्र आहे, जो पुरवठा व्यवसायाच्या दरम्यान किंवा व्यवसाय वृद्धीसाठी वापरण्यात येतो किंवा वापरण्याचा हेतू असतो.

ITCचा लाभ प्राप्त करून घेण्यास कोणत्या अटी आवश्यक आहेत?

ITCचा लाभ घेण्यासाठी नोंदणीकृत करपात्र व्यक्‍तीने खालील चार अटींची पूर्तता केली पाहिजे.  (क) नोंदणीकृत करपात्र व्यक्‍तीच्या ताब्यात कर बीजक (tax invoice) किंवा डेबिट नोट किंवा विहित केल्यानुसार असे इतर कर अदा केलेले दस्तऐवज असले पाहिजेत;  (ख) करपात्र व्यक्‍तीला वस्तू/माल आणि/किंवा सेवांची प्राप्ती होणे आवश्यक आहे; (ग) पुरवठाकर्त्याने पुरवठ्यावर आकारण्यात आलेला कर शासनाला प्रत्यक्ष अदा केला पाहिजे; आणि (घ) करपात्र व्यक्‍तीने कलम 39 अंतर्गत विवरण सादर केले असले पाहिजे.

जेथे एका बीजकातील वस्तू/माल एकगठ्ठा किंवा विलगपणे (lots or instalments) प्राप्त होतात, तेव्हा नोंदणीप्राप्त करपात्र व्यक्‍तीला इनपूट क्रेडिट टॅक्‍सचा (ITC) लाभ घेण्याचा हक्‍क कधी प्राप्त होईल?

त्या बीजकातील मालाचा अंतिम गठ्ठा किंवा अंतिम विलग भाग (last lot or instalment) प्राप्त झाल्यानंतर, नोंदणीकृत करपात्र व्यक्‍ती इनपूट टॅक्‍स क्रेडिटचा (ITC) लाभ घेऊ शकते.

पुरवठयासाठी पुरवठाकर्त्याला करासह मोबदला अदा न करता व्यक्‍ती इनपूट टॅक्‍स क्रेडिट घेऊ शकते का?

होय, प्राप्तकर्ता इनपूट टॅक्‍स क्रेडिट घेऊ शकतो. परंतु प्राप्तकर्त्याने बीजक निर्गमित  केलेल्या तारखेपासून 180 दिवसांच्या आत करासह मोबदला अदा करणे आवश्यक आहे. सदर अट लागू नाही जेथे रिव्हर्स चार्ज आधारित कर अदा केला जातो.

बीजक निर्गमित  केलेल्या तारखेपासून 180 दिवसांच्या आत करासह मोबदला अदा केला नाहीतर नोंदणीकृत व्यक्‍तीने घेतलेल्या इनपूट टॅक्‍स क्रेडिटचे (ITC) काय होईल?

इनपूट टॅक्‍स क्रेडिटची (ITC) रक्‍कम  व्यक्‍तीच्या उत्पादन कर दायित्वामध्ये जोडली जाईल. त्याला व्याजही अदा करणे आवश्यक असेल. तथापि मोबदला आणि कर यांच्या अधिदानानंतर (payment) सदर व्यक्‍तीला इनपूट टॅक्‍स क्रेडिट (ITC) पुन्‍हा घेता येईल.

करपात्र व्यक्‍तीच्या खेरीज अन्‍य व्यक्‍तीकडे जेव्हा वस्तू/मालाची पोचवणी करण्यात येते, तेव्हा ITC चा लाभ कोणाला प्राप्त होईल? (“देयक प्राप्तकर्ता (bill to) – “पुरवठा प्राप्तकर्ता” (ship to) अशा परिस्थितीत).

सदर करपात्र व्यक्‍तीच्या सूचनेवरून वस्तू/मालाची पोच त्रयस्थ व्यक्‍तीकडे केली जाते, तेव्हा नोंदणीकृत व्यक्‍तीला वस्तू किंवा माल प्राप्त झाला असे मानण्यात येईल. ज्याच्या आदेशानुसार वस्तू किंवा मालाची पोचवणी त्रयस्थ व्यक्‍तीला करण्यात आली, त्या व्यक्‍तीला इनपूट टॅक्‍स क्रेडिटचा (ITC) लाभ प्राप्त होईल.

इनपूट टॅक्‍स क्रेडिटचा (ITC) लाभ प्राप्त करून घेण्याची कालमर्यादा काय आहे आणि त्याची कारणे काय आहेत?

नोंदणीकृत व्यक्‍तीला वस्तू/माल किंवा सेवांच्या पुरवठ्यासाठी निर्गमित  केलेल्या कोणतेही बीजक किंवा डेबिट नोट संबंधी इनपूट टॅक्‍स क्रेडिट, कलम 39 अंतर्गत वार्षिक विवरण दाखल करावयाच्या देय तारखेनंतर, ज्या आर्थिक वर्षाशी संबंधित सदर बीजक/बीजकाशी संबंधित डेबिट नोट आहे, त्या आर्थिक वर्ष समाप्तीनंतर येणारा आगामी सप्टेंबर महिना किंवा वार्षिक विवरण दाखल केल्याची तारीख, यापैकी जे अगोदर असेल ते, त्यानंतर इनपूट टॅक्‍स क्रेडिटचा (ITC) लाभ घेता येणार नाही.

About the Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like these

Enquiry Now
close slider